चंद्रयान 3 (Chandrayaan 3) आज चंद्रावर यशस्वी उतरण्याची शक्यता आहे. हे यान यशस्वीरित्या उतरावे यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. अनेक लोक आपापल्या परीने प्रार्थना करत आहेत. यात सामान्य नागरिक आणि कलाकारांचाही समावेश आहे. नागपूर येथील भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यांगना पूजा हिरवाडे यांनीही अशाच प्रकारे प्रर्थना केली आहे. त्यांनी 'नमो नमो भारताम्बे' आणि चांद्रायण गीतावर भरतनाट्यम सादर केले आहे. अवकाशात 14 जुलै रोजी पाठवलेले चंद्रयान यशस्वी लँड व्हावे हा या नृत्यापाठचा उद्देश आहे.
ट्विट
#WATCH | Nagpur, Maharashtra | Bharatanatyam and Kuchipudi dancer Pooja Hirwade performs Bharatanatyam on 'Namō Namō Bhāratāmbē' and Chandrayaan Anthem.
Chandrayaan-3 is all set to successfully land on the moon today around 6.04 pm IST. pic.twitter.com/6Z40gmgbqj
— ANI (@ANI) August 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)