Beed Accident : बीड (Beed)च्या गेवराई तालुक्यातील तलवाडा गावात ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक (Truck Bike Accident) झाली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू (died) झाला. युनूस शेख (वय 32, रा. बणेवाडी ता. गेवराई) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघाताची दृष्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. अपघातानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक चालकाला जमावाने पकडलं. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा:Chhatrapati Sambhajinagar Fire: छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग; एकाच घरातील 7 जणांचा मृत्यू )
बीडमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. pic.twitter.com/8rFZbWMKPS
— Rohini Gudaghe (@gudaghe_rohini) April 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)