छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली असून यात दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे कपड्याचे दुकान छावणी दाना बाजार  गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते. (हेही वाचा -  Navi Mumbai Fire: नवी मुंबईत नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग, अग्निशमक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल)

शहरातील छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या आग लागलेल्या इमारतीत एकूण 16 लोक होते. पहिल्या मजल्यावर 7 लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर 7 लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर 2 लोक होते.  यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

पाहा पोस्ट -

याबाबत माहिती देताना औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितलं की, "पहाटे चारला छत्रपती संभाजीनगरातील कॅन्टोन्मेंट परिसरात एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. प्राथमिक तपासानंतर या दुर्घटनेत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मात्र, या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.