बारामती मध्ये बुरूडमाळ गावात मागील 77 वर्षांत पहिल्यांदा मतदान केंद्र उभं राहिलं आहे. अवघ्या 41 मतदारांसाठी हे मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. बुरूडमाळ हे पुण्यातील सर्वात लहान मतदान केंद्र आहे. या गावात मागील फेब्रुवारी महिन्यापर्यंत रस्ता नसल्याने गावकर्‍यांना 12 किमी दूर सांघवी गावात जाऊन मतदान करावं लागत होते मात्र आता पहिल्यांदाच या गावकर्‍यांना त्यांचं मतदान केंद्र मिळालं आहे. बुरूडमाळ च्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे मतदान केंद्र सुरू करण्यात आले आहे. नक्की वाचा: Sharad Pawar Lok Sabha Voting 2024: शरद पवार पुन्हा बारामतीचे मतदार; यंदा मुंबई नव्हे तर माळेगाव मध्ये बजावणार मतदानाचा हक्क! 

 बुरूडमाळ गावात 77 वर्षांत पहिल्यांदा मतदान केंद्र  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)