Sharad Pawar Lok Sabha Voting 2024: शरद पवार पुन्हा बारामतीचे मतदार; यंदा मुंबई नव्हे तर माळेगाव मध्ये बजावणार मतदानाचा हक्क!
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

बारामतीची लोकसभेची निवडणूक (Baramati Lok Sabha Election) यंदा मोठी प्रतिष्ठेची झाली आहे. एकीकडे 3 टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरूद्ध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाप्रमाणेच बारामतीकरांसाठी देखील ही निवडणूक मोठी महत्त्वाची आहे. या निवडणूकीसाठी शरद पवार स्वतः बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. सुप्रिया सुळेंसाठी प्रचार सभा घेतल्यानंतर आता ते मतदान देखील लेक सुप्रिया सुळेंसाठी करणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar) 7 मे दिवशी माळेगाव (Malegaon)  मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

लोकसभा निवडणूकीसाठी 7 मे ला तिसर्‍या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये शरद पवार यंदा मुंबई ऐवजी बारामतीच्या माळेगाव मधून मतदान करणार आहेत. काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आपलं मतदान केंद्र बारामतीमधून मुंबई मध्ये बदलून घेतलं होतं मात्र आता ते पुन्हा बारामती मध्ये मतदान करणार आहेत. 1967 पासून ते बारामतीच्या रिमांड होम या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत होते. 2014 पर्यंत ते पवार कुटुंबीयांसोबत रिमांड होम येथे मतदान करत होते. मात्र एनसीपी मध्ये पडलेल्या फूटीनंतर शरद पवार पुन्हा बारामती मध्ये मतदान करणार आहेत. माळेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ते मतदान करणार आहेत. मतदानाच्या दिवशी शरद पवार हे गोविंदबागेतच थांबणार आहेत. Sharad Pawar Health: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द .

दरम्यान लोकसभा निवडणूकीमध्ये अजित पवार एकाबाजूला आणि त्यांचे उर्वरित सारे कुटुंब दुसर्‍या बाजूला सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी उभे राहिलेले दिसले आहे. पवार कुटुंबातील सार्‍या लेकी, सुना सुप्रिया सुळेंसाठी प्रचारात फिरताना दिसल्या. कालच्या सांगता सभेमध्येही सारे पवार कुटुंब सभेत उपस्थित राहून सुप्रिया सुळेंसाठी मतदान करण्याचे आवाहन करत होते.

शरद पवारांनी लोकसभा निवडणूकीमध्ये 22 दिवसांत 52 सभा घेतल्या आहेत. काल बारामती मध्ये सांगता सभेमध्ये त्यांच्या चेहर्‍यावर, आवाजात थकवा जाणवत होता. पुढील काही शरद पवार आराम करणार असल्याचे सांगण्यात आले आहेत. त्यांचे पुण्यातील काही नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.