ह्ब्ज शनिवारी अहमदनगरमधील कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर नाशिक मध्ये दाखल झालेल्या अमित ठाकरे यांच्या गाडीची रात्री सिन्नर येथील गोंदे टोलनाक्यावर गाडी अडवल्यानंतर मनसे कडून पुन्हा खळ्ळ खट्याक झालं. दरम्यान दुसर्या दिवशी अमित ठाकरे यांनी नेमकं काय घडलं याची हकिकत मीडीयासमोर सांगितली. अमित ठाकरे शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन रात्री त्यांच्या खाजगी कामाला बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत पोलिस नव्हते. गाडी गोंदे टोलनाक्यावर पोहचली तेव्हा गाडीवर फास्ट टॅग असूनही ती थांबवली गेली. तिथे काही तांत्रिक गोंधळ होता. अमित ठाकरेंच्या सहकार्यांनी त्याबद्दल सांगितलं असता टोलनाक्यावरील कर्मचारी उद्धटपणे बोलू लागले. त्यांच्या मॅनेजरचे वॉकी टॉकी वर ऐकलेलं संभाषण देखील उद्धटपणाचे असल्याचे अमित ठाकरे म्हणाले. पुढे 15 मिनिटांनी गाडी सोडण्यात आली. जेव्हा हा प्रकार नाशिक, सिन्नर मध्ये कळला तो पर्यंत अमित ठाकरे हॉटेलवर पोहचले होते आणि मनसैनिकांनी राडेबाजी करत टोलनाका फोडला होता. (हेही वाचा, Amit Thackeray: सिन्नरच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी थांबवली, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची केली तोडफोड (Watch Video))
अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)