महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पण त्यामध्येच मागील आठवडाभरात राज्यातील अनेक भागात धुव्वाधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता युवासैनिकांनी पूरग्रस्त भागात मदत करावी असं आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी देखील आपला पदाधिकारी मेळावा रद्द करत मनसैनिकांना पूरस्थितीच्या ठिकाणी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
युवासैनिकांनो!
आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा... सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे... जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची "हीच ती वेळ".
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)