Ajit Pawar-Amit Shah Meet: उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीडतास चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Socially टीम लेटेस्टली|

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय पेच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्याबाबत निवडणूक आयोगासमोर होणारी सुनावणी दरम्यान ही बैठक झाली. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीडतास चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी विश्रांती घेत होते, त्यानंतर आज अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. (हेही वाचा: Dilip Walse Patil Meet Sharad Pawar: अजित दादा गटातील दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel
Close
Latestly whatsapp channel