धारधार कोयत्याने तरुणीवर हल्ला करण्याची घटना काही दिवसांपूर्वीच पुणे येथे घडली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. दरम्यान, अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरामध्ये घडल्याचे पुढे आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत आरोपीवर कारवाई करणयाचे अवाहन पोलिसांना केले आहे.

चाकणकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहर मध्ये भर रस्त्यात मुलींची छेडछाड केली जात असल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. भरदिवसा रस्त्यात मुलींना असा त्रास देण्याचा प्रकार गंभीर आणि मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या व्हिडीओची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलिस अधीक्षक, अहमदनगर यांना तातडीने चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)