Chandrayan 3 Landing: चाद्रंयानच्या यशस्वी लॅंडिंग नंतर देशभरात कौतुकांचे आणि आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक जण हा सण आपआपल्या परिने साजरा करत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चंद्रावर पोहचणारा भारत हा चौदा देश आहे. सोबत काल चंद्राने दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला भारत देश आहे. त्यामुळे भारतीयांच्या माना उंचावल्या आहे. हा आंनदी क्षण साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी इस्त्रोला सोशल मीडियावर वरून शुभेच्छा दिल्या. मुंबईकरांनी लोकल मध्ये राष्ट्रगीत गाऊन हा क्षण साजरा केला आहे.या आनंदी क्षणाचा सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सोबत काल अंधेरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी भारत माता की जय असा घोषवारा करत जल्लोष साजरा करत आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनवर नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. चांद्रयान चंद्रावर पोहचल्यावर नागरिकांचा आंनद गगनात मावेनासा झाला आहे.
आमची मुंबई!
अभिमानास्पद!❤
चांद्रयान-३ च्या यशस्वी लॅंडिगनंतर मुंबई लोकलमधील चित्र! pic.twitter.com/PyHpPw7vpp
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) August 23, 2023
अंधेरी रेल्वे स्थानकावर साजरा केला हा क्षण
अंधेरी स्टेशन चा बाहेरची दृश्य जेव्हा चांद्रयान चंद्रावर पोहोचल 🚩🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/U1YPGdMjQi
— Dipesh Surve (@samanya_khasdar) August 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)