Additional Local Trains For Mumbai: विद्यमान सेवांवरील दबाव कमी करण्यासाठी मंत्रालय पाच वर्षांत मुंबईसाठी अतिरिक्त 250 उपनगरीय लोकल ट्रेन सुरू करणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या हितासाठी 50 ते 100 लांब पल्ल्याच्या गाड्याही सुरू करण्यात येणार आहेत. ‘शहरातील लोकांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी आम्ही सर्वांगीण प्रयत्न करत आहोत. मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोघांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्या सुधारात्मक उपाययोजना राबवून लोकांना प्रवास करताना कमीत कमी समस्यांना सामोरे जावे लागेल,’ असे वैष्णव म्हणाले. बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘लोकमान्य टिळक टर्मिनसचा आणखी विस्तार करण्याबरोबरच पनवेल, कल्याण, कुर्ला आणि परळ येथे चार नवीन टर्मिनस देखील प्रस्तावित करण्यात आले आहेत, ज्यामुळे विद्यमान टर्मिनसवरील दबाव कमी होईल आणि सेवेची गुणवत्ता सुधारेल,’ असेही मंत्री म्हणाले. महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी केंद्राने 15,940 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे, असे सांगून वैष्णव म्हणाले की, नवीन रेल्वे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत राज्य प्रचंड प्रगती करत आहे. (हेही वाचा; BMC Digital Hoardings Policy: डिजिटल होर्डिंग्ज चालकांसाठी चकवा; मुंबई महापालिका धोरणात्मक निर्णयाच्या तयारीत)
पहा पोस्ट-
Mumbai Infra News: Additional 250 Local Trains For City In Next 5 Years, Announces Railway Minister Ashwini Vaishnaw#Mumbai #UnionRailwayMinister #AshwiniVaishnav #250NewSuburbanTrains #100LongDistanceServices @bhalu25 https://t.co/zdsJQM8Myz
— Free Press Journal (@fpjindia) July 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)