Omicron दहशतीच्या पार्श्वभूमीवर Aaditya Thackeray यांची BMC अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक; कोविड 19 लसीकरणात 2 डोस मधील कालावधी कमी करण्यासाठी केंद्र सरकार कडे मागणी करणार असल्याची माहिती

वॅक्सिन आणि मास्क या दोन गोष्टी कोविड 19 ला रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने त्यावर लक्ष देण्याच्या सूचना या बैठकीत समोर आल्या आहेत.

Omicron दहशतीच्या पार्श्वभूमीवर Aaditya Thackeray यांची  BMC अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक;  कोविड 19 लसीकरणात 2 डोस मधील कालावधी कमी करण्यासाठी केंद्र सरकार कडे मागणी करणार असल्याची माहिती
आदित्य ठाकरे । PC: Twitter/Aaditya Thackeray

Omicron दहशतीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची  BMC अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. राज्यात अद्याप कोरोना रूग्ण नाही पण धोका टाळण्यासाठी सरकार अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे. मुंबई मध्ये कोरोना लसीचा पहिला डोस 100% नागरिकांना देण्यात आला आहे.पण दुसर्‍या डोसचं प्रमाण 72% आहे. आता अधिकाधिक लोकांना दुसरा डोस देण्यासाठी दोन मात्रांमधील कालावधी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसे झाल्यास मुंबईमध्ये जानेवारी 2022 च्या मध्यापर्यंत 100% नागरिकांना दुसरा डोस देणंही शक्य होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2021 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).