Public Holiday On 22nd January In Maharashtra: अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Mandir) 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकार सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर केली आहे. कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, छत्तीसगड, गोवा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक भाजप शासित राज्यांनी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गुरुवारी, केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील सर्व केंद्रीय सरकारी कार्यालयांमध्ये अर्धा दिवस काम करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे, वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने सांगितले की, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि प्रादेशिक ग्रामीण बँका 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंतच सुरु राहतील. (हेही वाचा - Ram Lalla's Face Revealed: भाळी टिळा, हाती धनुष्य आणि स्मितहास्य देणार्या 5 वर्षाच्या भगवान श्रीरामाचे इथे पहा लोभस रूप! (View Pic))
A public holiday has been declared by #Maharashtra state on Monday January 22 on the occasion of Ram Temple opening in Ayodhya. pic.twitter.com/nBHHQqul2M
— Richa Pinto (@richapintoi) January 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)