करवा चौथचा उपवास न करणे ही व्यक्तीची निवड आहे. ती क्रूरता नाही आणि वैवाहिक संबंध तोडण्यासाठी पुरेसे नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, भिन्न धार्मिक श्रद्धा असणे आणि काही धार्मिक कर्तव्ये न पाळणे देखील क्रूरता ठरत नाही. त्यामुळे सदर कारणे ही घटस्फोट घेण्यासाठी प्रबळ मानता येणार नाहीत. करवा चौथ उपवास करणे किंवा न करणे ही वैयक्तिक निवड असू शकते. जर वैराग्यपूर्ण विचार केला तर त्याला क्रूरतेचे कृत्य म्हटले जाऊ शकत नाही. भिन्न धार्मिक श्रद्धा असणे आणि काही धार्मिक कर्तव्ये न पाळणे, हे क्रौर्य नाही किंवा ते वैवाहिक संबंध तोडण्यासाठी पुरेसे नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. (हेही वाचा, Wife Swapping Case In Bengaluru: मित्रासोबत पत्नीची आदलाबदली, वाईफ स्वॅपींग प्रकरणी बंगळुरु येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)