कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या BA.4 उप प्रकाराने भारतात प्रवेश केला आहे. देशातील या व्हेरिएंटची पहिली केस हैदराबादमध्ये आढळून आली आहे. गुरुवारी कोविड-19 जीनोमिक सर्व्हिलन्स प्रोग्राममधून हे उघड झाले. भारतीय SARS-CoV-2 Consortium on Genomics (INSACOG) शी संबंधित शास्त्रज्ञांनी सांगितले की, भारताकडून BA.4 उप प्रकाराचे तपशील 9 मे रोजी GISAID वर प्रविष्ट केले गेले. SARS CoV 2 विषाणूचा हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतील नवीन कोरोना व्हायरस संसर्गाच्या मोठ्या लाटेसाठी जबाबदार आहे. हा प्रकार लसीकरणाद्वारे प्रदान केलेल्या रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील परिणाम करण्यास सक्षम आहे.
INSACOG confirms first case of Omicron subvariant BA.4 in India
Read @ANI Story | https://t.co/W4AkSKLY6l#Omicron #COVID19 #OmicronSubvariant pic.twitter.com/hIkYafBSeI
— ANI Digital (@ani_digital) May 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)