Tulsi Vivah 2023 Mangalashtak in Marathi: कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीला भगवान शालिग्राम आणि माता तुळशीचा विवाह आयोजित केला जातो. मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा केल्याने भाविकांचे सर्व संकट दूर होतात, असा विश्वास आहे. कार्तिक महिन्यातील देवोत्थान एकादशीला तुळशीविवाह होतो. पौराणिक कथेनुसार, या दिवशी माता तुळशी आणि भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाचा विवाह झाला. या दिवशी तुळशीची पूजा करताना मंगलाष्टक (तुलसी मंगलाष्टक) पठण करावे. असे मानले जाते की असे केल्याने रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख-समृद्धी येते. आज तुळशीविवाह पार पडणार आहे. यानिमित्त तुम्ही खालील मंगलाष्टक व्हिडिओ लावून तुळशीचं लग्न लावू शकता. (हेही वाचा - Tulsi Vivah 2023 Wishes in Marathi: तुळशी विवाहानिमित्त Messages, Wishes, Whatsapp Status, SMS द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!)
तुळशी विवाह मंगलाष्टक व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)