Buddha Jayanti 2023 Quotes in Marathi: पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. यावेळी वैशाख पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची असणार आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्ध प्रकट झाले होते, म्हणून याला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात. यंदाही वर्षातील पहिले चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. या दिवशी माता लक्ष्मी, नारायण आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या दानाचेही विशेष महत्त्व आहे. आज सर्वत्र बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी होत आहे. यंदाचे पहिले चंद्रग्रहणही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. असे मानले जाते की बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा 4 मे गुरुवारी रात्री 11.45 वाजता सुरू झाली असून ती दुसऱ्या दिवशी 5 मे शुक्रवारी रात्री 11.29 वाजता समाप्त होईल. (हेही वाचा - Buddha Purnima 2023 Date: बुद्ध पौर्णिमेची तारीख आणि संपूर्ण पूजा विधी, जाणून घ्या)
चित्त हे पाण्याप्रमाणे आहे. जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही. पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळंही दिसतो. - गौतम बुद्ध

एक क्षण एक दिवस बदलू शकतो,
एक दिवस आयुष्य बदलू शकतो
आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो.
- गौतम बुद्ध

तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक कवटाळून ठेवलेले असतं - गौतम बुद्ध

गौतम बुद्ध यांचे सकारात्मक विचार -
आदर हा आरशाप्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल.-गौतम बुद्ध

सामंजस्यातूनच खऱ्या प्रेमाचा जन्म होतो. सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते.

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)