Eid-ul-Adha 2024: देशभरात आज सर्वत्र मुस्लिम बांधवानी बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अधा (Eid-ul-Adha 2023) साजरी करत आहेत. विविध ठिकाणी मुस्लिम समूदायाने सामूहिक नमाज पठण केलं. ईद-अल-अधा इस्लामिक कॅलेंडरच्या शेवटच्या महिन्याच्या धुल-हिज्जाच्या 10 व्या दिवशी येते. ईद-उल-अधाच्या निमित्ताने, दिल्लीत हजारोंच्या संख्येने मुस्लिम समुदाय जामा मशिदीत नमाज अदा करताना दिसला. तर मुंबईत माहीममधील मखदूम अली माहिमी मशिदीत ईद-उल-अधा निमित्त नमाज अदा करण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुले जामा मशिदीत ईद-उल-अधाच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. ईद-अल-अधा ला मुस्लिम समुदायाच्या नागरिकांमध्ये महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
व्हिडीओ पाहा-
#WATCH | Delhi: Devotees offer Namaz at the Jama Masjid on the occasion of Eid Al Adha festival. pic.twitter.com/OnufmNVisx
— ANI (@ANI) June 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)