Vat Purnima 2022 Mehndi Designs: नेपाळ, उत्तर भारत आणि महाराष्ट्र, गोवा, कुमाऊं आणि गुजरात या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये वट पौर्णिमा हा सर्वात धार्मिक उत्सव आहे. हा सण तीन दिवस साजरा केला जातो, विशेषत: स्त्रिया त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी या दिवशी कठोर उपवास ठेवतात. पारंपारिक हिंदू कॅलेंडरनुसार, हा सण जेष्ठ महिन्यात साजरा केला जातो. जो ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मे-जूनमध्ये येतो. वट पौर्णिमा 2022 मंगळवार, 14 जून रोजी येत आहे.
वट पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. हिंदू पौराणिक कथेनुसार, असे मानले जाते की, वटवृक्ष हे भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांचे प्रतीक असलेल्या 'त्रिमूर्ती' चे प्रतिनिधित्व करते. कुटुंबातील स्त्रिया वटवृक्षाभोवती धागे बांधतात. मंत्रोच्चार करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घाआयुष्यासाठी प्रार्थना करतात. खर तर हिंदू धर्मात कोणत्याही सणाला मेहंदी लावण्याची प्रथा आहे. वट पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या हातावर खास मेहंदी काढत असतात. तुम्हाला वट पौर्णिमेसाठी खास मेहंदी काढायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास डिझाईन्स घेऊन आलो आहोत. (हेही वाचा - Vat Purnima 2022 Ukhane: वट पौर्णिमेच्या पूजेनंतर सख्यांकडून होणारा उखाण्यांचा हट्ट पुरवण्यासाठी खास वट सावित्री व्रत विशेष उखाणे!)
वटपौर्णिमेनिमित्त काढा या खास मेहंदी डिझाईन्स -
Watch Tutorial Video For Vat Purnima Henna Designs -
Vat Purnima Vrat Mehndi -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)