महाराष्ट्रात वट पौर्णिमा (Vat Purnima) अर्थात ज्येष्ठ पौर्णिमेला सवाष्ण महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा हा सण 14 जून 2022 दिवशी साजरा केला जाणार आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा अशा तीन दिवसांचे त्यासाठी व्रत ठेवण्याची पद्धत आहे. या दिवशी महिला साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात. ग्रामीण भागात मैत्रिणींसोबत हा सण साजरा करताना काही खेळ खेळले जातात. या दरम्यान वटपौर्णिमेच्या पूजा निमिताने एकत्र जमल्यानंतर एक हट्ट हमखास केला जातो तो म्हणजे उखाणांचा. हे देखील नक्की वाचा: Vat Purnima 2022 Messages: वट पौर्णिमेनिमित्त Wishes, Images, WhatsApp Status, Greeting द्वारे सुवासिनींना द्या खास मराठी शुभेच्छा!
वटपौर्णिमेच्या निमित्ताने पूजेची तयारी तुम्ही केली असेल पण आयत्या वेळेस उखाण्यांचा हट्ट झाल्यास गडबड गोंधळ उडू नये म्हणून या सणाच्या निमित्ताने खास आणि सोपे उखाणे लक्षात ठेवून बाहेर पडा आणि तुमच्या सख्यांसोबत या दिवसाचा आनंद लूटा!
वटपौर्णिमा 2022 उखाणे
मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर एक माहेर
... रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर!
वटपौर्णिमेच्या दिवशी आज ठेवला मी उपवास,
_____ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.
पैठणी साडीला बनारसी खण,
_____ रावांचे नाव घेते, आज आहे_____ सण.
आज मागणे मागते देवाला, पूर्ण होऊदेत तुमच्या ईच्छा,
______ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात सुख- दुःख, दोन्ही असावे.
_______ रावांसारखे पती, जन्मो-जन्मी मिळावे
नववधूंमध्ये वटपौर्णिमा सणाचा विशेष उत्साह असतो. पहिली वटपौर्णिमा साग्रसंगीत साजरी करण्यासाठी खास तयारी केली जाते. यंदा पौर्णिमेचा प्रारंभ 13 जून 2022 रोजी उत्तर रात्रौ 9 वाजून 03 मिनिटांनी होणार असून ही पौर्णिमा तिथीची समाप्ती 14 जून 2022 रोजी सायंकाळी 05 वाजून 22 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे 14 जूनच्या सकाळी महिला वटपौर्णिमेचा पूजा विधी साजरा करू शकणार आहेत.