1 जानेवारी दिवशी भीमा कोरेगाव शौर्यदिन पाळला जातो. सामाजिक ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या या लढ्यात शहीद झालेल्या शूरवीरांना आज आदरांजली अर्पण केली जात आहे. हा लढा 1 जानेवारी 1818 मध्ये कोरेगाव भीमा येथे लढला गेला होता. आज रोहित पवार, छगन भुजबळ, रामदास आठवले यांच्यासह मान्यवरांकडून X वर खास पोस्ट करत या लढ्यात प्राणाची आहुती देणार्या शूरवीरांना मानाचा मुजरा देण्यात आला आहे.
रोहित पवार
कोरेगाव भीमा येथील रणसंग्रामात अपार शौर्य गाजवताना बलिदान दिलेल्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/LTD8IslrNl
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 1, 2024
छगन भुजबळ
शौर्यदिन चिरायू होवो!
१ जानेवारी १८१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत पराक्रम गाजविणाऱ्या सर्व शूरवीरांच्या शौर्याला वंदन आणि या लढाईत धारातीर्थी पडलेल्या वीरांना विनम्र अभिवादन!#भिमा_कोरेगाव_शौर्यदिन pic.twitter.com/5bOFRUrlLL
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 1, 2024
रामदास आठवले
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) January 1, 2024
जयंत पाटील
शौर्य, सामाजिक एकतेचे प्रतीक असलेला आजचा विजय दिवस. भीमा कोरेगाव येथील रणसंग्रामातील अनामिक वीरांना विनम्र अभिवादन. #भिमा_कोरेगाव_शौर्यदिन pic.twitter.com/CMcSoP3Bpj
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 1, 2024
अजित पवार
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी १८१८ मध्ये झालेल्या ऐतिहासिक लढाईत वीरमरण पत्करणाऱ्या आणि अतुलनीय शौर्य गाजवून विजय मिळवणाऱ्या शहीद शूरवीरांना विनम्र अभिवादन करतो. pic.twitter.com/qg0ZXM3sLJ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)