पँटोन कलर इन्स्टिट्यूट दरवर्षी ट्रेंडचे विश्लेषण करून नवीन वर्षाचे रंग घोषित करते. नुकतेच त्यांनी 2024 वर्षासाठी एका सौम्य आणि सुंदर रंगाची घोषणा केली आहे. जगाने या वर्षी मानवी संघर्षाची अनेक दृश्ये जवळून पाहिली आहेत आणि म्हणूनच, मानवी करुणेचे प्रतीक मानून पॅन्टोनने ‘पीच फज’ (Peach Fuzz) कलरला वर्ष 2024 चा रंग म्हणून घोषित केले आहे. या शेडला अधिकृतपणे ‘पँटोन 13-1023 पीच फझ’, असे नाव देण्यात आले आहे. हा रंग कोमलतेचे प्रतीक आहे. तो काळजी, समुदाय आणि सहकार्याचा संदेश देतो. समाजात सहानुभूती आणि समजूतदारपणाची जाणीव प्रतिबिंबित करतो.  एकता आणि भावनिक कल्याणाची भावना वाढवणे हे या रंग निवडीमागील उद्दिष्ट आहे. आर्किटेक्चर आणि इंटीरियर डिझाइनच्या जगात पीच फझचा वापर स्वागत वातावरण तयार करण्यासाठी केला जातो. हा रंग शांतता वाढवतो आणि वैयक्तिक वाढीसाठी जागा प्रदान करतो. हा रंग पेंटिंगमध्ये असो, घराच्या सजावटीमध्ये असो किंवा फर्निचरमध्ये असो, तो जिव्हाळा आणि उबदारपणा वाढवतो.

पीच फझ आगामी वर्षभर डिझाइन, फॅशन आणि जीवनशैलीच्या विविध पैलूंवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे. पॅन्टोन कलर इन्स्टिट्यूटने 1999 मध्ये पॅन्टोन कलर ऑफ द इयर शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला, ज्याचा उद्देश जगभरातील डिझाइन समुदाय आणि रंगप्रेमींमध्ये संवाद वाढवणे हा आहे. (हेही वाचा: Khushi Kapoor in Sridevi's Iconic Gown: ‘The Archies’ च्या प्रिमियरला खूशी कपूर ने आई श्रीदेवीचा ड्रेस आणि दागिने परिधान करत दिली भावनिक मानवंदना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)