UP Crime News: यूपीच्या भदोहीमध्ये काही पुरुषांनी मिळून अपहरणाचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी पहाटे शहरातील मोड चौकी परिसरातील पश्चिम त्रिमुहनीजवळ घडली. घटनास्थळाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपहरणाचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ कैद झाला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एक 16 वर्षीय तरुणीचा भररस्त्यात चालत असताना अपहरण करण्याचा प्रयत्न करत होते. दोन बाईकवरून चोर अज्ञात व्यक्ती आले. तीला पकडून बाईकवर बसवण्याचा प्रयत्न करत असताना तीच्या समोर असलेल्या एका महिलेने तीला वाचवले. काही वेळात आजूबाजूच्या स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला वाचवताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. व्हिडिओ पाहून आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)