Uttar Pradesh: दररोज सोशल मीडियावर लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रसिध्दी मिळवण्यासाठी तरुण मंडळी काहीही करतात. त्यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. इंस्टाग्राम रिल स्टार सिमरन यादव हीनं नुकतंच पोस्ट केलेल्या व्हिडिओत बंदूकीचा वापर केल्याचे दिसले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तीच्यावर संताप व्यक्त केला आहे. तीने कायद्याचे उल्लघंन करत रिल्स शुट केले आहे. एकाने व्हिडिओवर कंमेट केले आहे की, तरुणीवर लवकर कारवाई करा. तरुणी उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील रहिवासी आहे. तरुणी रस्त्याच्या मधोमद उभी राहून व्हिडिओ शुट करत होती. लखनऊ पोलिस या प्रकरणी शोध घेत आहे.  (हेही वाचा- समोर आला राजस्थानच्या सवाई माधोपूर रोड अपघाताचा भीषण व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)