Rajasthan Road Accident Video: समोर आला राजस्थानच्या सवाई माधोपूर रोड अपघाताचा भीषण व्हिडिओ; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू (Watch)
गेल्या रविवारी हे कुटुंब सीकरहून कारमधून सवाई माधोपूर येथील रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेशाच्या दर्शनासाठी येत असताना, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला.
Rajasthan Road Accident Video: राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील बौनली पोलीस स्टेशन परिसरात एकाच कुटुंबातील 6 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आता या घटनेचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये एक्स्प्रेस वेवर झालेला हा रस्ता अपघात स्पष्टपणे दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिनी ट्रक चालकाचा निष्काळजीपणाही स्पष्ट दिसून येतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका कार सामान्य स्पीडमध्ये महामार्गावर प्रवास करत आहे. अचानक समोर उभा असलेला एक मिनी ट्रक यू-टर्न घ्याचा प्रयत्न करू लागतो. ट्रक वळलो इतक्यात मागून येणारी ही कार त्याला धडकते. या अपघातात तीन विवाहित जोडप्यांचा एकत्र मृत्यू झाला होता. अपघातानंतर मिनी ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला.
गेल्या रविवारी हे कुटुंब सीकरहून कारमधून सवाई माधोपूर येथील रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेशाच्या दर्शनासाठी येत असताना, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन निष्पाप मुले गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी लालसोट येथून मिनी ट्रक जप्त केला मात्र चालक अजूनही फरार आहे. (हेही वाचा: Viral Video: बाईकवर स्टंट करणंं पडंल महागात, व्हिडिओ व्हायरल होताच गुन्हा दाखल)
पहा व्हिडिओ-
राजस्थान : 5 मई को हुए सवाई माधोपुर हादसे का वीडियो आया सामने, ट्रक चालक की एक लापरवाही से एक ही परिवार के 6 लोगों की हुई थी मौत। #Sikar #Sawaimadhopur #Rajasthan #accident pic.twitter.com/P4dxETBOkD
— Punjab Kesari (@punjabkesari) May 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2024 01:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

