Delhi: दिल्लीतील मुखर्जीनगर परिसरातील एका ज्वेलरी दुकानाच्या बाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोळीबारची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका ज्वेलरी दुकानाच्या बाहेर दुचाकीवरून हेल्मेट घालून एक तरुणाला आला. त्याने खिश्यातली बंदूक बाहेर काढली आणि हवेत दोन ते तीन वेळा गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. एकाने लिहले की, हल्लेखोरांना आता पोलिसांची भिती राहिलीच नाही. तर दुसऱ्याने लिहले आहे की, यांच्यावर लवकर गुन्हा दाखल करावा. ही घटना २४ ऑगस्ट रोजी घडली आहे. (हेही वाचा- कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये पंजाबी गायक एपी धिल्लन यांच्या घराबाहेर गोळीबार)
दुकानाबाहेर गोळीबार पाहा व्हिडिओ
Man seen brandishing pistol outside a jewellery store in Delhi's Mukherjee Nagar area. #Delhi pic.twitter.com/fsfV5ze8Mf
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) September 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)