Madhya Pradesh Shocker: बुधवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका वृद्ध महिलेला जोडप्याने लाकडाने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओची दखल घेत भोपाळ पोलिसांनी आरोपी जोडप्याला अटक केली. व्हिडिओत मारहाण होत असलेली वृद्ध महिला या दाम्पत्याची आजी असून पती-पत्नी मिळून मारहाण करत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. X वर एका पोस्टमध्ये, भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणचारी मिश्रा यांनी शेअर केले की पोलिसांनी दीपक सेन आणि पूजा सेन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, जे मूळचे उत्तर प्रदेशातील झाशीचे आहेत.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)