भारत सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (Anil Chauhan) (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. माजी सीडीसी जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर देशाचे हे लष्करी पद 9 महिन्यांपासून रिक्त होते, ज्यांची जबाबदारी आता निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा तपशील देताना, संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कारकिर्दीत अनेक कमांड सांभाळल्या आहेत आणि त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील बंडखोरीविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)