रक्षाबंधन भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रक्षाबंधनाचा सण त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या निम्न पदावरील कर्मचाऱ्यांच्या मुलींसोबत साजरा केला. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, सफाई कामगार, शिपाई, माळी, ड्रायव्हर आणि पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींनी पंतप्रधान मोदींच्या हातावर राख्या बांधल्या. त्यांनी या सोहळ्याचा आणि पंतप्रधानांच्या त्यांच्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओही शेअर केला आहे.
पंतप्रधान निवासात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलींसोबत पंतप्रधान @narendramodi यांनी साजरं केलं रक्षाबंधन #RakshaBandhan #Rakhi @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/fvbpyegSuH
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)