नव्या संसद भवनाचं उद्घाटन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात PIL दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने Lok Sabha Secretariat कडून संविधानाचं उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे. राष्ट्राच्या प्रमुख असणार्‍या राष्ट्रपतींना आमंत्रण न देणं हे चूकीचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान 28 मे दिवशी दिल्लीत नव्या संसद भवनाचं उद्घाटन असून त्याला देशभरातून प्रमुख विरोधी पक्षांनी जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. New Parliament Inauguration: 'नव्या संसद भवनाच्या इमारतीला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित राहणार नाहीत' .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)