भाजपा खासदार हेमा मालिनी यांना पक्षाने यंदाच्या निवडणूकीतही उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणूकीसाठी अर्ज भरण्यापूर्वी आज त्यांनी मथुरेत यमुना पूजन केलं आहे. तसेच यावेळी खासदार म्हणून यमुना नदी शुद्धीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे. यमुनेला डोळ्यासमोर ठेवत तिला प्रॉमिस केल्याची प्रतिक्रिया हेमा मालिनींनी दिली आहे. भाजपा उमेदवार म्हणून हेमा मालिनी उद्या 4 एप्रिल दिवशी मथुरा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पहा ट्वीट
#WATCH | Mathura, Uttar Pradesh: BJP sitting MP and candidate from Mathura Lok Sabha constituency, Hema Malini says, "I came here to perform Yamuna Puja. Tomorrow, I will file my nomination, that's why I came here today to perform the puja... I promise this time we will purify… https://t.co/gC8DpnOMw7 pic.twitter.com/Pmeq1eTWMY
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)