Police Beaten Riksha Driver:  उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका पोलिस अधिकाऱ्यांने ई रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. अधिकाऱ्याने रिक्षा चालकाला भररस्त्यात मारहाण केली. केस ओढून ओढून मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.  व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानू प्रकाश असं मारहाण करणाऱ्या  पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसाने रिक्षा चालकाला मारहाण का केली हे अद्याप समोर आले नाही. पोलिसावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)