गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election) दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. पीएम मोदींनीही साबरमती विधानसभेच्या जागेवर मतदान केले. सकाळी 8 वाजल्यापासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात आज राज्यातील 14 जिल्ह्यांतील 93 विधानसभा जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सर्व लोकांना, विशेषत: तरुण मतदार आणि महिला मतदारांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडावे, असे आवाहन करतो. हेही वाचा Gujarat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आज अंतीम टप्प्याचं मतदान, जनतेचा कौल कुणाला?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)