PM Modi's Interaction with Bill Gates: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates)यांच्याशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डिजिटल क्रांती, आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, महिला शक्ती, हवामान बदल आणि प्रशासन या विषयांवर चर्चा केली आहे. शिवाय, पीएम मोदींनी हवामान बदलांना संबोधित करण्यासाठी भारताच्या सक्रिय भूमिकेवर चर्चा केली. त्याशिवाय, शाश्वत विकासासाठी देशाची वचनबद्धता अधोरेखित केली. पंतप्रधान मोदींची बिल गेट्स यांची संपूर्ण मुलाखत आज सकाळी ९ वाजता त्यांच्या @Narendra Modi या YouTube चॅनलवर प्रसारित करण्यात आली. (हेही वाचा :HC On Live-In Relationships: 'संविधानाने अधिकार दिले आहेत, पण...', लिव्ह इन रिलेशनशिपच्या ट्रेंडवर हायकोर्टाने व्यक्त केली चिंता )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)