Bihar Bridge Collapse:  बिहार येथील समस्तीपूर येथे बख्तियारपूर-ताजपूर गंगा महासेतू पुलाचा भाग कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पूलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना रविवारी सांयकाळी घडली. घटनेनंतर बांधकाम संस्थेचे कर्मचारी आणि अग्निशमन दल ढिगारा उचलण्यास मदत करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच हा पूलावर स्पॅन बसवण्यात आला होता. मात्र, रविवारी पूलावरचा स्पॅन कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांनी बख्तियारपूर-ताजपूर गंगा महासेतूची पायाभरणी केली. (हेही वाचा- उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न; कानपूरजवळ रेल्वे रुळावर आढळला गॅस सिलिंडर)

पूल कोसळला 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)