Rajouri Encounter: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संरक्षण अधिकार्याने सांगितले की, राजौरीजवळील दसल गुजरनच्या जंगल परिसरात संशयास्पद हालचाल लक्षात आल्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. त्यानंतर रात्रभर गोळीबार सुरू होता. जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग यांनी सांगितले की, एक दहशतवादी मारला गेला असून कारवाई सुरू आहे. (हेेही वाचा - Indian Army Shoots Pak Intruder: जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात बीएसएफ जवानांकडून पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा
#WATCH | J&K | One terrorist killed in an encounter with security forces in Rajouri's Dassal forest area. A search operation is underway.
Security checks are being done.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/IzfXtJ2xzw
— ANI (@ANI) June 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)