Fire Erupts at Income Tax office in Delhi: मंगळवारी आयटीओ परिसरातील सेंट्रल रेव्हेन्यू बिल्डिंगला लागलेल्या आगीत एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. पीडित, 46 वर्षीय पुरुष, तिथे ऑफिस सुपरिटेंडंट म्हणून काम करत होता. इमारतीतून सात जणांची सुटका करण्यात आली. आम्हाला दुपारी 3.07 वाजता इन्कम टॅक्स सीआर बिल्डिंगला आग लागल्याचा कॉल आला. आम्ही एकूण 21 अग्निशमन दल रवाना केले आहेत. पुढील तपासासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही स्थानिक पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे, अलं दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. (हेही वाचा -Fire Erupts at Income Tax office in Delhi: दिल्लीतील आयकर कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)