भारतीय ऑलिम्पिक संघटना 6 जुलै रोजी भारतीय कुस्ती महासंघ (WFI) निवडणुका आयोजित करेल. त्याच दिवशी निवडणुकीचे निकालही जाहीर होतील. मंगळवारी (13 जून) जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, रिटर्निंग ऑफिसरने जाहीर केले की, भारतीय कुस्ती महासंघ निवडणुका 6 जुलै रोजी होणार आहेत. सध्या कुस्ती महासंघाचे मावळते प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी करत देशातील नामवंत कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक घेतली जाणार आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी एफआयआरही नोंदवला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने निवडणूक प्रक्रियेला गती देण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केल्यानंतर एक दिवसानंतर निवडणुकीची घोषणा झाली. (हेही वाचा: गाझियाबाद धर्मांतर प्रकरणाच्या मास्टर माईंडला अखेर अटक, ऑनलाईन करायचा तरुणांचं धर्मांतर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)