Workers Trapped Under Sacks: कर्नाटकात मोठी दुर्घटना, स्टोरेज युनिट कोसळले; 10 हून अधिक कामगार अडकल्याची भीती

विजयपुराच्या बाहेरील अलीबाद येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या राजगुरू इंडस्ट्रीज या अन्न प्रक्रिया युनिटमध्ये सुमारे 50 कामगार कामात गुंतले होते. त्याचवेळी स्टोरेज युनिटचे चार संच कोसळले.

Workers Trapped Under Sacks: कर्नाटकात मोठी दुर्घटना, स्टोरेज युनिट कोसळले; 10 हून अधिक कामगार अडकल्याची भीती
Workers Trapped Under Sacks

Major Accident in Karnataka: कर्नाटकातील विजयपुरा येथील खासगी गोदामात एक मोठा अपघात झाला आहे. या ठिकाणी काही स्टोरेज युनिट कोसळल्याने 10 हून अधिक कामगार धान्याने भरलेल्या पोत्यांच्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. विजयपुराच्या बाहेरील अलीबाद येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या राजगुरू इंडस्ट्रीज या अन्न प्रक्रिया युनिटमध्ये सुमारे 50 कामगार कामात गुंतले होते. त्याचवेळी स्टोरेज युनिटचे चार संच कोसळले तेव्हा सुमारे 10 कामगार अडकले, प्रत्येकामध्ये 120 टन मका होता. पोलिसांनी पुष्टी केली की तीन कामगारांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले आणि त्यांना सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. (हेही वाचा: Maharashtra Suicide Cases: देशात 2022 मध्ये महाराष्ट्रात झाल्या सर्वाधिक आत्महत्या; रोजंदारीवर काम करणारे सर्वाधिक असुरक्षित: NCRB Data)

पहा व्हिडिओ- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2023 11:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).