गेल्या आठवड्यात, अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले की, ‘देशातील तरुण पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करून आणि अनेक लोकांसोबत मुक्त संबंधांच्या लालसेने त्यांचे जीवन खराब करत आहेत. मात्र इतके करूनही त्यांना त्यांचा ‘खरा जीवनसाथी’ मिळत नाही.’ न्यायालयाने पुढे म्हटले की, ‘या देशात तरुणाईला सोशल मीडिया, चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सिरीजच्या प्रभावाखाली त्यांना त्यांच्या आयुष्याची योग्य दिशा ठरवता येत नाही आणि योग्य जीवनसाथीच्या शोधात ते अनेकदा चुकीच्या व्यक्तीची संगत निवडतात.’

एका मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने हे निरीक्षण केले. न्यायालयाने असेही नमूद केले की, या प्रकरणात पीडित मुलीचे अनेक मुलांशी ‘अफेअर्स’ होते आणि नंतर कुटुंबातील विरोधामुळे तिला या मुलांशी नाते तोडावे लागले, अखेर हताश होऊन तिने आत्महत्या केली. आपल्या आदेशाच्या पान-7 मध्ये खंडपीठाने असेही नमूद केले आहे की, तरुण पिढी, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून, सोशल मीडिया, चित्रपट इत्यादींवर दाखवल्या जाणाऱ्या नातेसंबंधांवर विश्वास ठेऊन अनेक नात्यांमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यानंतर त्यांच्या जोडीदाराच्या निवडीला सामाजिक मान्यता न मिळाल्याने ते ‘निराश’ होतात. (हेही वाचा: Karnataka High Court: कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय, दुसरी पत्नी पती, सासऱ्यांविरुद्ध क्रूरतेची तक्रार दाखल करू शकत नाही)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)