पश्चिम बंगाल राज्यातील बालुरघाट येथील एका घटनेचा कथीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. @news24tvchannel या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत दिसते की कार्यालयात बसलेल्या एका व्यक्तीवर बाहेरून आलेला व्यक्ती खुर्च्या फेकत आहे. कार्यालयात या वेळी खुर्चीवर बसलेला आणि खुर्च्या फेकणारा अशा दोनच व्यक्ती उपस्थित आहेत. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ट्विटर हँडलवर व्हिडिओसोबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, बालुरघाट येथे घडलेली ही घटना एका सरकारी कार्यालयातील आहे. हे कार्यालय BDO यांचे असून खुर्च्या फेकणारा व्यक्ती भाजप नेता आहे. काही कारणामुळे नाराज झालेला हा भाजप नेता बीडीओवर खुर्च्या फेकताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)