केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मनंथावाडीजवळ शुक्रवारी 12 जणांना घेऊन जाणारी जीप 30 मीटर खोल दरीत पडली, त्यात सर्व महिलांसह नऊ जण ठार झाले आहेत. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहे. अपघात झालेल्या जीपमधील महिला मजूर चहाच्या बागेत काम करून घरी परतत होत्या. ही घटना दुपारी 3.30 च्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेले सर्व जण वायनाड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. राज्याचे वनमंत्री एके ससेंद्रन यांनी सांगितले की, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांना मनंथावाडी रुग्णालयात जाण्याचे निर्देश दिले, जिथे जखमींवर उपचार केले जात आहेत. मृतदेहही याच रुग्णालयात असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: Cloud Burst In Mandi: हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्याने 51 लोक अडकले; एनडीआरएफने नागरिकांना बाचवले)
#WATCH | Kerala | Nine people died, two injured after their jeep fell into a gorge near Thalapuzha in Wayanad district today. https://t.co/GRMc76Gv6M pic.twitter.com/V14Kuv1aja
— ANI (@ANI) August 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)