Water Enters in UP State Assembly: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये उष्णतेच्या वातावरणात आज मुसळधार पावसाची नोंद झाली. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला, असला तरी पाणी साचण्याची समस्या त्रासदायक ठरली. महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभेतही पावसाचे पाणी शिरले. सध्या विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधानसभेत शिरलेल्या पाण्यातून कर्मचारी पँट उचलून आत-बाहेर करताना दिसत आहेत. विधानभवन रस्त्यावर अनेक फूट पाणी साचले होते. याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. विधानसभेच्या तळघरातही पाणी भरले आहे. विधानसभेत पाणी शिरल्यानंतर अनेक आमदार सभागृहातून बाहेर पडले. कर्मचारी बादल्या, वायपर आणि मशीन वापरून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

विधानसभेत पाणी शिरल्याने सीएम योगी सात क्रमांकाच्या गेटमधून बाहेर पडत होते. मात्र त्या गेटजवळही पाणी साचल्याने त्यांना दुसऱ्या गेटमधून जावे लागले. लखनऊमधील मुसळधार पावसाने संपूर्ण शहर अनेक ठिकाणी जलमय झाले आहे. शहरातील रस्ते पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेले दिसून आले. (हेही वाचा: Kerala Weather Update: वायनाडसह केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)