पंजाबच्या संगरूळ येथे पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणाने एक धक्कादायक वळण घेतले. या ठिकाणी पतीने भररस्त्यात पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यानंतर त्याने स्वतः सल्फा खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दोघांनाही जखमी अवस्थेत सुनम येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पटियाला येथे रेफर करण्यात आले आहे. गजबजलेल्या बाजारात पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. माहितीनुसार, दोघांमध्ये घटस्फोट सुरू असून दोघेही वेगळे राहत होते, मात्र अचानक दारूच्या नशेत असलेल्या पतीने बाजारात पत्नीला पहिले व तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. या हल्ल्यानंतर आणि मारहाणीनंतर दोघांनाही सुनम येथे आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पटियाला येथे रेफर केले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगरमध्ये पाणीपुरीवाल्याकडून दारुड्या तरुणाची हत्या; परिसरात खळबळ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)