Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगरमध्ये पाणीपुरीवाल्याकडून दारुड्या तरुणाची हत्या; परिसरात खळबळ

राज्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाली आहे. या गुन्हेगारीच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगरमध्ये पाणीपुरीवाल्याकडून दारुड्या तरुणाची हत्या; परिसरात खळबळ
Crime | (File image)

राज्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाली आहे. या गुन्हेगारीच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पुंडलिक नगर भागात एका पाणीपुरी वाल्याने दारुड्या तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या खूनाच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीपुरीवाल्याने एका दारुड्या तरुणाची डोके ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. (हेही वाचा - Kalyan Crime: पत्नी आणि पतीच्या कुटूंबिक वादामुळे मेव्हण्यांनी भावोजीला केले ठार, मृतदेह फेकलं नदीत; कल्याण हादरले)

रोहीत चौधरी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून पुंडलिक नगर भागात एका बार समोर या दोन तरुणांमध्ये अचानक वाद सुरू झाला. दहा रुपयांमध्ये दारू मिळते का? यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. हा वाद इतका वाढत गेला की या भांडणाचे रूपांतर हारामारी झाले. या भांडणात आरोपी रोहितने जवळील गट्टू उचलून समोरील तरुणांच्या डोक्यात घाव घातले, ज्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपी रोहित चौधरी स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला.

(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2023 11:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).