Kalyan Crime: पत्नी आणि पतीच्या कुटूंबिक वादामुळे मेव्हण्यांनी भावोजीला केले ठार, मृतदेह फेकलं नदीत; कल्याण हादरले
कल्याण परिसरात मेव्हण्यांनी भावोजीची हत्या केली आणि धक्कादायक म्हणजे मृतदेह उल्हास नदीत फेकलं.
Kalyan Crime: पती पत्नीच्या वादात दोन मेव्हण्यानी भावोजीची हत्या करून त्याचा मृतदेह उल्हास नदीत फेकला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कल्याण खडकपाडा ही धक्कादायक घडना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कल्याण पोलीसांनी तिन्ही आरोपीला अटक केले. नदीत मृतदेह अद्यापही सापडला नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. पत्नी आणि पतीमध्ये भांडण सुरु असताना मेव्हाण्यांनी मध्यस्थी केली आणि बहीणीच्या पतीची अपहरण करून हत्या केली.
शहबाज शेख असे हत्या झालेल्या मृताचे नाव आहे. शहबाजची पत्नी मुमताज काही दिवसांपुर्वी भांडण झाल्यामुळे ही दोन मुलांसह माहेरी आली होती. थोड्या दिवसांनी शहबाज आपल्या मुलांना घ्यायला मुमताजच्या माहेरी आला. त्यावेळी मुलांना मी घरी घेवून जायला आलो आहे या कारणांवरून मुमताज आणि शहबाज यांच्या पुन्हा वाद सुरु झाला. मुमताजाच्या वडिलांना आणि तीच्या भावंडाना समजताच, त्यांनी मध्यस्थी केली. भांडण जोरजोरात सुरु झालं. मुलाला घेवून जातान शहबाजला मेव्हण्यांनी अडवले. त्यानंतर जबरदस्तीने दोघे मेव्हणे आणि एका मेव्हण्याच्या मित्रांनी शहबाजला रिक्षात टाकले आणि कुठेतरी अज्ञात ठिकाणी घेवून गेले. शहबाजला भरपुर मारहाण केली. त्यांच तोंड बंद करावं म्हणून त्याचा गळा आवळून मारून टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याचा जीव गुदमरला. आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी मृतदेह उल्हास नदीत फेकला.
कल्याण मध्ये या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम सुरु केली. अद्यापही मृतदेह सापडला नाही अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. पत्नी आणि पतीच्या भांडणामध्ये मेव्हणांनी मध्यस्थी केली. आणि मेव्हणांनी भावोजीला संपवून टाकले. या धक्कादायक घटनेमुळे कल्याण परिसर हादरले आहे. पोलीसांनी तिन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2023 10:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

