भारत सरकारच्या महत्त्वकांशी रेल्वे प्रकल्पात असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये नेहमीच काही तरी गडबड होताना आढळून येत आहे. वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या जेवणात झुरळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयआरसीटीसीकडून मागवलेल्या जेवणात झुरळ आढळल्याने प्रवाशी चांगलाच संतप्त झाला. या प्रवाशाने थेट रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर आयआरसीटीसीने सेवा देणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई केली आहे. या प्रवाशाने रेल्वेच्या या भोंगळ कारभाराला वाचा फोडतानाच या अन्नात झुरळ निघाल्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
पाहा ट्विट -
@IRCTCofficial found a cockroach in my food, in the vande bharat train. #Vandebharatexpress#VandeBharat #rkmp #Delhi @drmbct pic.twitter.com/Re9BkREHTl
— pundook🔫🔫 (@subodhpahalajan) July 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)