Stunts on Bike: दुचाकीवरील स्टंटबाजी आणि त्यामुळे घडणाऱ्या अपघातांच्या अनेक बातम्या समोर आली आहेत. यामध्ये काही जणांना आपला जीवही गमावावा लागला आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना गुजरातच्या वडोदरा येथे समोर आली आहे. वडोदरा येथे स्टंट बाईकची एका कारला जोरदार धडक बसली असून, यामध्ये बाईक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती बाईकवर स्टंट करत गाडी चालवत आहे. अशात स्टंटबाजी करताना या तरुणाचे भान राहत नाही आणि तो समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकतो. या धक्कादायक घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: Heart Attack on Palm Tree Video: व्यक्तीला ताडाच्या झाडावर आला हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू; Bhuvanagiri येथील दुःखद घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)