देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. विविध भागांमध्ये विवाहसोहळ्यांबाबत मोठी उत्सुकता आहे. लग्नसमारंभात नाच, गाणे आणि धमाल अशा गोष्टी दिसून येतात. या सगळ्यात काही दुःखद घटनाही घडतात. कुठे लग्नात गोळीबार, तर कुठे मारामारी होते. मात्र अलीकडच्या काळात लग्नसमारंभात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणही वाढले आहे. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधून समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील एटा येथे एक तरुण आपल्या भावाच्या लग्नात डीजेवर नाचत होता. नाचत असताना हा तरुण अचानक जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Viral Video: सायकलवरून सिलेंडर घेऊन जाताना अचानक लागली आग; अनुभवी व्यक्तीने 'अशी' विझवली आग, पहा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)