Viral Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती सायकलवरून गॅस सिलेंडरची वाहतूक करताना दिसत आहे. मात्र, यादरम्यान, अचानक सिलिंडरला आग लागते. सिलिंडरला आग लागल्यानंतर तीन जण मिळून ती विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात, पण ते अयशस्वी झाल्यावर अनुभवी व्यक्ती क्षणार्धात उपाय शोधून आग आटोक्यात आणते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आग लागल्यानंतर तीन जण त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना यश येत नाही. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे पोहोचतो आणि क्षणातच सिलिंडरला लागलेली आग आटोक्यात आणतो. हा व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या X खात्यावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुमच्यादेखील कामात येऊ शकतो.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)